कोरोनाची दुसरी लाट पडू शकते महागात ! होवू शकते ‘असे’ काही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या आठ महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीच्या संकटाने केलेल्या आघाताने जगाचे झालेले आर्थिक नुकसान पुढील काही वर्षेही भरून न निघणारे आहे. कोरोनामुळे तसेच इतर आजारांमुळे गेल्या आठ महिन्यात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले असून या सोबतच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

तसेच अनेकांचे उद्योगधंदे बंद झाले असल्यामुळे अनेक नागरिक मानसिक ताण तणावाखाली आले आहेत. लॉकडाउननंतर वाढलेली दारू व अंमली पदार्थांची विक्री याचा थेट संबंध कुठे ना कुठे मानसिक आरोग्याशी नक्कीच आहे. पैशाचे सोंग कसे करणार, हाच एक दाहक प्रश्न सर्वांसमोर आहे.

त्यामुळे येत्या काळात आत्महत्या, अमली पदार्थांचे सेवन आदी प्रकार वाढण्याची भीती आहे. मानसिक आरोग्य समस्या हे कोरोना महामारीपेक्षाही मोठे संकट आहे व याची दाहकता आज आपण सर्वजण अनुभवत आहे. मानसिक ताण जाणवत असलेल्या नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून मदत मागावी.

लोकांच्या संपर्कात राहावे, व्यायाम करावा आणि गरज भासेल तेव्हा मनोविकार तज्ञांशी बोलावे. मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी लोकांनी आपल्या मित्रमंडळी व कुटुंबियांशी सक्रियपणे बोलत राहावे,

आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये अथवा मित्र परीवारामध्ये नैराश्याची आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीची लक्षणे दिसल्यास सावध व्हावे, त्यांच्या शंकांचे निरसन करून देणे ही काळाची फार गरजेचे आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe