अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- देशात एकदा काँग्रेस विरुध्द सर्व पक्ष एकत्र आले होते. आता भाजप विरुध्द अन्य सर्व पक्ष एकत्र आले आहेत. भाजपने देशात मोठी ताकद उभी केल्याने हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत.
पक्षात चढ-उतार येतात.मात्र, अशा परिस्थितीत पक्षाला पुढे नेण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद आहे, असा विश्वास विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी केला.
नगरमध्ये भाजपच्या संघटन पर्व तसेच भाजप पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बागडे म्हणाले, भाजपने देशात मोठी ताकद उभी केल्याने हे सर्वपक्ष एकत्र आले आहेत. पक्षात चढ-उतार येतात. मात्र, अशा परिस्थितीत पक्षाला पुढे नेण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद आहे.
उत्तर नगर जिल्हाध्यक्षासाठी १४, दक्षिण जिल्हाध्यक्षासाठी १७ व शहर जिल्हाध्यक्षासाठी ८ जणांची नावे आली होती. या सर्वांचे म्हणणे जाणून घेतले. त्यात कुणीही पदाचा आग्रह केला नाही.
कोअर कमेटीने सर्व नावावर चर्चा करून ती नावे प्रदेशला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड म्हणाले, जिल्ह्यात कधी काळी भाजप चौथ्या क्रमांकावर होता.
आता जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. सर्वांच्या योगदानामुळे पक्षाला चांगले दिवस आले आहेत. संघटनात्मक कामे व्हावीत, यासाठी शहर व ग्रामीणला तीन जिल्हाध्यक्ष असणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले, संघटनेमुळे माणसे मोठी होत असतात. जिल्ह्यात पक्षाचे चांगले काम झाले आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…
लग्नाची पत्रिका असो किंवा नसो तरी देखील कार्यकर्त्यांनी लग्नाला जावे, असा सल्ला बागडे यांनी देतानाच लग्नाला गेल्यानंतर तुम्हाला कोण विचारणार आहे हा कुणाकडून आला ते. कार्यक्रमांना गेल्यामुळेच कार्यकर्ता प्रतिभा संपन्न होतो.