आत्मनिर्भर भारत : विश्वगुरु भारत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-आत्मनिर्भर भारत होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात स्वतः चा व्यायाम आणि आहार या पासून होते असे प्रतिपादन स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी यावेळी आशीर्वचनात सांगितले नगर येथील बांधकाम व्यवसायिक आणि संघाचे प.महाराष् प्रांताचे संपर्क प्रमुख रवींद्र ( राजाभाऊ) मुळे यांनी लिहलेले आत्मनिर्भर भारत विश्व गुरु भारत या पुस्तकाचे प्रकाशन श्रध्देय पूजनीय गोविंद देव गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

ओंन लाईन झालेल्या या कार्यक्रमात लघु उद्योग भारती चे क्षेत्रीय कार्यकर्ते श्री रवींद्र सोनवणे ,भारतीय मजदुर संघाचे श्री आण्णा धुमाळ आणि संघाचे क्षेत्रीय संपर्क प्रमुख श्री . कैलाश जी सोनटक्के सहभागी झाले होते. एका मोठ्या परिवर्तनाचा सुत्रपात या पुस्तकात आहे आणि सर्व भाषा मधून या पुस्तकाचे भाषांतर व्हावे किंबहुना हिंदी ,इंग्रजीत तर नक्की होणे गरजचे आहे असे सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते श्री . प्रदीप लोखंडे यांनी शिक्षण ,शेती ,उद्योग हे तीन आत्मनिर्भर भारताचे स्तंभ आहेत असे सांगून या तिन्ही गोष्टींचे या पुस्तकात उल्लेख आहे असे सांगितले. प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्री विनायक राव गोविलकर यांनी आत्मनिर्भरता ही आता प्रत्येक देशाची आवश्यकता होत चालली आहे आणि त्यामुळेच WTO या संस्थेचे महत्व कमी होत चालले आहे तसेच बहुपक्षीय करार ऐवजी द्वी पक्षीय करार होवू लागले आहेत.

छोट्या छोट्या देशांचे आर्थिक गट तयार होत आहेत त्याच वेळेस भारताची आत्मनिर्भर होण्याची क्षमता आहे हे पण सिद्ध होत आहे असे सांगताना या पुस्तकातील मजकूर याच अनुषंगाने महत्वाचे आहे असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. पुस्तकाचे लेखक म्हणून मनोगत व्यक्त करताना श्री रवींद्र मुळे यांनी आपण चुकीची जीवनशैली अवलंबली आणि पश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आपली संस्कृती विसरलो.

त्या मुळे जणू एखाद्या अंधाऱ्या गुहेतून आपला प्रवास सुरू झाला आहे असे वाटायला लागले पण त्याच वेळी अजूनही वेळ गेली नाही हे जाणवले आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना आपल्याला पुन्हा वैभवशाली दिवस आणू शकते त्यातूनच विश्वगुरुत्वा कडे आपली वाटचाल होणार आहे हे जाणवल्या मुळे हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा मिळाली असे प्रतिपादन केले या पुस्तकाचे आकर्षक कव्हर पेज आणि रेखाचित्र प्रसिद्ध चित्रकार रवी देव यांची असून

पुस्तकाला श्रध्देय गोविंद देव गिरी महाराज यांची प्रस्तावना दिशा दर्शन देणारी ठरली आहे. या नवीन ऑनलाईन तंत्राद्वारे झालेल्या देखण्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजिंक्य कुलकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक लघु उद्योग भारतीचे मंदार लेले यांनी प्रास्ताविक केले. आभार श्री रवींद्र देशपांडे यांनी मांडले.

आर्थिक समूह प्रमुख श्री. मिलिंद राव देशपांडे यांच्या हस्ते प्रसिद्ध प्रकाशक अमेय लाटकर यांचा सत्कार करण्यात आला. सदर पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशनपूर्व नोंदणीत संपली आहे आणि दुसऱ्या आवृत्तीची नोंदणी सुरू झाली आहे असे प्रकशिका सौ. मनीषा मुळे यांनी सांगितले . आत्मनिर्भर भारत विश्व गुरु भारत या पुस्तकाचे प्रकाशन श्रध्देय पूजनीय गोविंद देव गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment