शरद पवारांवर हल्ला करणाऱ्याला अटक !

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : २०११ मध्ये देशाचे तत्कालीन कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

अरविंदर ऊर्फ हरविंदर सिंग असे आरोपीचे नाव आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. नवी दिल्लीच्या एनडीएमसी केंद्रामध्ये २४ नोव्हेंबर २०११ रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रम सुरू असताना अरविंदरने पवार यांच्या कानशिलात लगावली होती.

या प्रकरणी अरविंदर सिंगला अटक करून त्याच्याविरोधात खटला सुरू करण्यात आला होता; परंतु खटल्याच्या सुनावणीदरम्यान तो अचानक गायब झाला.

विविध भागात लपून राहत असल्याने त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. २९ मार्च २०१४ रोजी पटियाला हाऊस न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.

अखेर पोलिसांनी ११ नोव्हेंबरला स्वरूपनगर भागातून अरविंदरला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार दिल्लीच्या कॅनॉट प्लेस व संसद मार्गावरील ठाण्यात त्याच्याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment