उमरगा :- तालुक्यातील मुळज येथील एका महाविद्यालयीन मुलीची सातत्याने छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी मुलीने
दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक व पोक्सो अंतर्गत सोमवारी (दि.२) रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाविद्यालयीन युवतीने उमरगा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुळज येथील अजित लहू मुळजे हा महाविद्यालयास जात असताना वारंवार छेड काढत
अश्लील इशारे करुन व लज्जास्पद कृत्य करत होता. दरम्यान, या मुलीस घरासह पेटवून देण्याचा प्रयत्न छेड काढणाऱ्यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे.