अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- एल्गार परिषदेचे आयोजक, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान, लाल किल्ल्यावर ज्यानं झेंडा फडकवला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माणूस होता, असा थेट आरोप कोळसे पाटील यांनी केला आहे. यावेळी बोलताना कोळसे पाटील यांनी अनेक गोष्टींचा संदर्भ देत मोदी सरकारवर निशाणा साधला. “पंतप्रधान मोदींनी देशासाठी बरंच काही केलं आहे, असं सांगितलं जातं.
मात्र प्रत्यक्षात त्यांनी काहीही केलेलं नाही.” , असा आरोपही बी. जी. कोळसे पाटील यांनी मोदींवर केला आहे. पुण्यात शनिवारी एल्लार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील श्री गणेश क्रीडा कला मंच येथे एल्गार परिषद पार पडली.
परिषदेला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी बरेच काही केले असे सांगितले जाते. मात्र, त्यांनी काहीही केले नाही, असे सांगतानाच पठाणकोटमध्ये मुंगी देखील जाऊ शकत नसताना तेथे दहशतवादी कसे काय घुसले?, असा सवालही कोळसे पाटील यांनी केला.
हा सवाल उपस्थित करतानाच त्यांनी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना झेंडा फडकवणारा मोदींचाच माणूस होता, असा आरोप कोळसे पाटील यांनी केला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved