राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शहरातील फतेह चौकातून प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस शिपायांनी बच्चू कडू यांना अडवून आतमध्ये जाण्यास विरोध केला.
नंतर लक्षात आले की, बच्चू कडू यांनी हे ‘स्टिंग ऑपरेशन’ केलं आहे. झालं अस, अकोल्यातील कमटेन्मेंट झोनमध्ये फिजिकल डिस्टसिंगचा बोजवारा उडाल्याचं चित्र गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्यात पहायला मिळालं.

या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ केलं. बैदपुरा भागातील कंटेन्मेंट झोनमध्ये आपली ओळख लपवून जाण्याचा बच्चू कडू यांनी प्रयत्न केला.
मात्र, पोलीस शिपायांनी बच्चू कडू यांना आतमध्ये जाण्यास विरोध केला. मात्र, सुदैवानं पालकमंत्र्यांच्या परिक्षेत अकोला पोलीस उत्तीर्ण झाले.
मात्र, पुढच्या काळात प्रतिबंधित क्षेत्रात संचारबंदीची आणखी कठोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी पोलीसांना दिल्या.