अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जारे हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार बोठे फरार झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठे याचा शोध घेण्यात आला. तो हैद्राबाद येथे असल्याची माहीती मिळाल्यानंतर सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली.
बोठेच्या मागावर असणारी पथके हैदराबाद येथेच तळ ठोकून होते. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये बोठे याने या पथकांना तीनदा गुंगारा दिला.

बिलालनगर हे हैद्राबाद मधील कुख्यात ठिकाण असून मोठा पोलिस फोर्स घेउन गेल्याशिवाय तेथून आरोपीस ताब्यात घेणे शक्य नव्हते. त्यासाठी हैद्राबाद पोलिसांचीही मदत घेण्यात आली.
बिलालनगरमधील प्रतिभानगर भागातील एका लॉजमध्ये बोठे यास आश्रय देण्यात आला होता. लॉजमधील खोलीच्या दाराला बाहेरून कुलूप लावून आत बोठे यास ठेवण्यात आले होते.
पोलिस पथकांना मिळालेल्या विश्र्वसनीय माहीतीप्रमाणे बोठे हा त्याच खोलित होता. त्यामुळे ती खोली उघडून त्यास ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आले, त्यावेळी बोठे हा एकटाच खोलीत होता.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













