अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर :- पक्ष संकटात सापडला, तेव्हा मी प्रदेशाध्यक्ष झालो. अनेकांनी भाजपत पळ काढला. जिल्ह्यात बारा-शून्य करण्याच्या वल्गनाही केल्या, पण काय झाले? आपण श्रीरामपूरला भक्कम साथ देऊ. तुमचा संसार तुम्ही करा, आम्ही खंबीरपणे सोबत राहू. शेजारच्यासारखा सत्तेवर डोळा ठेवणार नाही, असे सांगत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखे यांच्यावर टीकास्र साेडले.
माजी आमदार जयंत ससाणे यांच्या द्वितीय पुण्यस्मृतीनिमित्त शनिवारी आयोजित कृतज्ञता पुरस्कार व नागरी सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते.
यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे व लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, राजश्री ससाणे, दीपाली ससाणे, अरुण नाईक, संजय छल्लारे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, अशोक थोरे, अनिल कांबळे, आशिष धनवटे, लकी सेठी, राजेंद्र देवकर, सुधीर नवले आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, भाजपचे राजकारण देशाला परवडणार नसल्याचे सर्वांचे मत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त भाषणे करून लोकांचे पोट भरले. जयंत ससाणे हे सर्वसामान्यांचे नेते होते. त्यांच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व आणि दूरदर्शीपणा होता. सहा महिन्यांत खंडकरी व आकार पडीत जमिनीचा प्रश्न मार्गी लावून धरू. जयंत ससाणे यांनी लोणी आणि संगमनेर या दोघांनाही जवळ ठेवले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १४१ कोटींचा निधी आणला, असे खासदार लोखंडे यांनी सांगितले. फक्त काँग्रेस, काँग्रेस करू नका, मलाही गृहित धरा असा टोला त्यांनी थोरातांना लगावला. आमदार डॉ. तांबे म्हणाले, ससाणे हे दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या डोक्यात सतत श्रीरामपूरच्या विकासाचा विषय असायचा.
आमदार कानडे म्हणाले, आमदार झाल्यानंतर संगमनेर-नेवासे रस्त्यासाठी १२५ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. २२० केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र मंजूर केले. करण ससाणे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन संतोष मते, प्रास्ताविक सचिन गुजर यांनी केले, तर आभार सुभाष तोरणे यांनी मानले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com