मुंबई: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते पदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे कट्टर विरोधक असलेले विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी व उपनेतेपदी नसीम खान यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
तसेच, बसवराज मुरुमकर यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती झाली आहे. याशिवाय, सुनील केदार, जयकुमार गोरे, प्रणिती शिंदे, के. सी. पाडवी,यशोमती ठाकूर, यांच्याकडेही विधानसभेच्या प्रतोदपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तर विधानपरिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे आणि उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांचीही नियुक्ती झाली आहे.
तसेच मुंबईतील कॉंगेसचे आमदार भाई जगताप यांची विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोदपदी निवड केली आहे.