राज ठाकरेंवर बाळासाहेब थोरात बरसले; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत त्यांनी, राज्य सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असा टोला लगावला होता.

सरकारमधील तीन पक्षांमध्ये एकोपा नाही, असेही त्यांनी नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना प्रतिसवाल केला आहे.

ते म्हणाले,’ एका पक्षाचे सरकार असो किंवा तीन पक्षाचे सरकार, फरक असतोच. तिन्ही पक्ष मिळून एकमताने निर्णय घेतले जातात. आम्ही एकत्रपणे यापुढेही काम करणार आहोत’.

राज ठाकरेंना सरकारमध्ये अंतर्विरोध नक्की कुठे दिसला? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. मतभेद असले तरी आमचे एकजुटीने काम सुरू आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment