बाप्पा मोरया”! सिरम ची लस कंटेनर मधून रवाना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-सध्या कोरोना विषाणू ने जगा मध्ये हाहाकार माजवला आहे. काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आले आहे.

यातच आता आशेचा किरण दिसत आहे आणि तो सुद्धा आपल्या भारत देशामधून. सिरम इन्स्टिटयूट ने तयार केलेल्या लसीला परवानगी मिळाली आहे आणि लवकरच आता भारता मध्ये लसीकरणाला सुरुवात होणार आहे .

भारतात येत्या २६ जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात होईल अशी आशा वर्तवली जात आहे आणि त्या दृष्टीने पावले सुद्धा उचली जात आहे.

देशभर आता dry run नावाने लसीकरणाची रंगीत तालीम सुद्धा झाली आहे. आज कोविड लसीचे डॉस पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट मधून वितरणासाठी रवाना झाले आहे.

लस असलेले कंटेनर कडेकोट बंदोबस्ता मध्ये विमानतळावर गेले. आज पहाटे ४ च्या सुमारास सिरम इन्स्टिटयूट मधून “कोव्हिडशील्ड ” व्हे डोस घेऊन तीन कंटेनर बाहेर पडले आहे.

तत्पूर्वी नारळ फोडून कंटेनरची पूजा करण्यात आली आहे. हार फुले वाहून कंटेनर ची पूजा करण्यात आली आहे. या वेळी सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment