अहमदनगर Live24 : पहिल्यांदा दांडक्याचा प्रसाद, त्यानंतर दंडात्मक कारवाई, भररस्त्यात उठबशा आदी मार्गांचा अवलंब केल्यानंतरही विनाकारण फिरणाऱ्यांना लगाम बसत नसल्याने
अखेर शिर्डी पोलिस व वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम हाती घेत दंडात्मक कारवाई करतानाच संबंधितांना रुग्णवाहिकेत टाकून आरोग्य तपासणीसाठी साई संस्थानच्या रुग्णालयात पाठवले.
या कारवाईचा शहरात मोकाट फिरणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. काहीजण विनाकारण फिरत असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली
वाहतूक शाखेचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे, शिर्डी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे, हेड काॅन्स्टेबल सूर्यवंशी, फड, दरदंले आदींसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेत
द्वारका सर्कलवर विनाकारण दुचाकीवर व पायी फिरणाऱ्यांवर कारवाई केली. मोटारसायकली ताब्यात घेत दंडात्मक कारवाई करत
रुग्णवाहिकेतून थेट साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात तपासणीसाठी रवाना केले. तीन तास ही मोहीम राबवण्यात आली. यापुढेही ती चालू ठेवण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®