Beach In Konkan: ‘हा’ आहे महाराष्ट्रातील सर्वात शांत समुद्रकिनारा! पाहू शकतात 20 फूट खोल समुद्राचे पाणी, पावसाळ्यात नक्की द्या भेट

Ajay Patil
Published:

Beach In Konkan:- महाराष्ट्राला निसर्गाने जे भरभरून दिले आहे त्यामध्ये कोकणाचा समावेश आपल्याला करावा लागेल. कोकणावर तर निसर्गाने जणू काही सढळ हातांनी दिले आहे व या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य आणि अथांग असे समुद्राचे दर्शन पर्यटकांच्या मनाला भुरळ घालणारे असते. कोकणामध्ये असणारे स्वच्छ समुद्रकिनारे व  त्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यात एक वेगळीच मजा आपल्याला येते.

तसे पाहायला गेले तर महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यातील काही समुद्रकिनारे हे स्वच्छ आणि नितळ पाण्याचे आहेत व काही समुद्रकिनारे सर्वात शांत समुद्रकिनारे म्हणून देखील ओळखले जातात.

सौंदर्य डोळ्यात मावणारे नसते व पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणी निवांत क्षण घालवणे म्हणजे मनाला किंवा आपल्याला स्वर्ग सुख लाभल्यासारखे होते. कोकणामधील असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये ज्याला महाराष्ट्रातील देवभूमी देखील म्हटले जाते अशा कोकणामध्ये  तारकर्ली बीच हे खूप महत्त्वाचे असून हा महाराष्ट्रातील सर्वात शांत समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो.

 तारकर्ली बीच आहे महाराष्ट्रातील सर्वात शांत बीच

कोकणामधील तारकर्ली हे एक सुंदर ठिकाण असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. तारकर्ली गावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे काही समुद्रकिनारी आहेत ते सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे म्हणून ओळखले जातात.

या ठिकाणच्या समुद्रकिनारे इतके स्वच्छ आहेत की तुम्ही दिवसाला वीस फूट खोल समुद्राचे पाणी देखील आरामात पाहू शकता. समुद्राचे इतके स्वच्छ दृश्य तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही.

तसेच तारकर्ली गावातील तारकर्ली बीच पासून सहा किलोमीटर अंतरावर आचरा बीच आहे. या आचरा बीचचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी थंडगार हवामान तुम्हाला अनुभवायला मिळते. तसेच आचरा बीच येथील धार्मिक महत्त्व देखील खूप जास्त असून या ठिकाणी भगवान रामेश्वरांचे 260 वर्षे जुने मंदिर बांधले आहे व ते पाहण्यासाठी लांबून  पर्यटक येतात.

 तारकर्ली गावाला आहे ऐतिहासिक महत्त्व

तारकर्ली गावाला एक ऐतिहासिक महत्त्व देखील आहे व शिवरायांच्या कालावधीमध्ये बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला या गावाच्या जवळ आहे. आपल्याला माहिती असेल की 100 पोर्तुगीज वास्तुविशारद आणि 1000 पेक्षा जास्त मजुरांनी या किल्ल्याचे बांधकाम केले आहे व या किल्ल्यामध्ये अनेक देवदेवतांचे मंदिरे तुम्हाला पाहायला मिळतात.

तारकर्ली येथे समुद्रकिनाऱ्यांशिवाय तुम्ही सुंदर तलाव देखील पाहू शकतात. या ठिकाणी असलेल्या धमपुर तलाव हा दहा एकरावर पसरलेला आहे व हा तलाव बांधण्याकरिता राजा नागेश देसाई यांनी 1530 मध्ये दोन गावे बुडवली होती असे म्हटले जाते.

 तारकर्लीला जायचे तर कसे जावे?

तुम्हाला जर तारकर्लीला जायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणहून 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरावे लागते. याशिवाय सावंतवाडी रेल्वे स्थानक 39 किलोमीटर असून कणकवली रेल्वे स्टेशन 52 किलोमीटर अंतरावर आहे.

या तिन्ही रेल्वे स्टेशन वरून तुम्हाला तारकर्ली  समुद्रकिनाऱ्याला जाण्याकरिता बस, ऑटो तसेच कॅब मिळतात. विशेष म्हणजे तुम्ही स्कूटरने देखील या बीचवर जाऊ शकतात व तुम्हाला 300 ते 400 रुपये भाडे देऊन स्कूटर मिळतात.

 विमानाने जाता येईल का?

तारकर्ली पासून सर्वात जवळचे विमानतळ दाबोलिम, गोवा असून जे फक्त 132 किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळावरून तुम्ही चेन्नई, कोलकाता तसेच हैदराबाद, बेंगलोर व इतर मोठे शहरांसाठी देखील टेकऑफ घेऊ शकता. या ठिकाणी उतरल्यानंतर तुम्हाला कॅब किंवा खाजगी वाहनाने तारकर्लीला येता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe