पुणे: तरुणाची विवस्त्र धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कॅम्प परिसरात घडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पीडित तरुण हा मूळचा कर्नाटकचा असून काही दिवसांपूर्वी त्याने गाडी दुरुस्तीचा व्यवसाय करत होता.
16 नोव्हेंबरपूर्वी जॅग्वार कंपनीची गाडी दुरुस्तीसाठी आरोपींच्या ओळखीने पीडिताकडे आली होती. त्यामुळे आरोपींनी पीडित तरुणाला दुरुस्तीच्या खर्चापेक्षा पाच लाख रुपये अधिक घ्यायला सांगितले.
पण पीडित तरुणाने गाडी मालकाकडून अडीच लाख रुपये घेतले. याच रागातून 16 नोव्हेंबरला आठ युवकांनी खंडणीसाठी त्याच अपहरण केलं, अपहरण करुन पीडीत युवकाला खराडी परिसरात नेऊन मारहाण केली.
नंतर त्याला मारहाण करत नग्न करत पीडीत युवकाची कॅम्प परिसरात रात्री विविस्त्र धिंडही काढण्यात आली.
आणि पहाटे साडे तीन वाजता पुन्हा त्याला गॅरेजजवळ आणून सोडले.
या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.