संपूर्ण महाराष्ट्रात साखरझोपेत असताना रातोरात राष्ट्रपती राजवट हटवली गेली. इतकंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही पार पडला.
एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
Ajit Pawar after taking oath as Deputy CM: From result day to this day no party was able to form Govt, Maharashtra was facing many problems including farmer issues, so we decided to form a stable Govt pic.twitter.com/GucfUVBCnm
— ANI (@ANI) November 23, 2019
याबबत अजित पवार म्हणाले 24 ऑक्टोबरला निकाल लागला. तेव्हापासून आतापर्यंत कोणीही सरकार बनवू शकले नाही. महाराष्ट्रासमोर मोठी संकटे आहेत.
शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या समस्या सोडविण्यासाठी व निर्णय वेगवान करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. गेले एक महिनाभर चर्चा काही संपतच नव्हती. मार्ग निघत नव्हता. नको त्या मागण्या पुढे येत होत्या.
हे पाहता आताच अशा समस्या येत असतील तर हे तीन पक्षांचे सरकार पुढे कसे टिकणार. यामुळे मी निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी सांगितले.