हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ला हार्दिक शुभेच्छा -अजित पवार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरणीय खासदार शरद पवार यांचे अभिष्टचिंतन केले.

आदरणीय शरद पवारसाहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय उत्कृष्ट असा व्हर्च्युअल रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष आणि फ्रंटलच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

१२ डिसेंबर हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. तो क्षण आज आपण एकत्र घालवला याचा आनंद होतोय. राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत. हे काम आपल्याला पुढे न्यायचे आहे.

शेवटी पवारसाहेबांची शिकवण आहे की, राज्यावर संकट आल्यानंतर आपण धावून गेले पाहिजे. मागच्या ५० वर्षांपासून आपण पवारसाहेबांना सामाजिक जीवनात काम करताना पाहतोय. ८० व्या वर्षीही ते त्याच ताकदीने काम करत आहेत. मला तर वाटतं, पवारसाहेबांसारखा नेता या शतकात तरी होणार नाही.

पवारसाहेबांसारखे नेते आपल्याकडे आहेत, याचा मला अभिमान आहे. राज्यातील १३ कोटी जनतेच्यावतीने आणि उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment