विकासाचा भगीरथ सदैवं नामदार साहेब !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याची भूमी थोर संतांची, ऐतिहासिक परंपरा लाभलेला जिल्हा. यामध्ये असंख्य थोर शिक्षण तज्ञ सहकाराच्या पंढरीमध्ये विविध व्यवस्थेचा उगम झालेला आहे. यातच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याच विचारावर वाटचाल करणारे माजी मंत्री आमदार श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील उर्फ नामदार साहेब.

आज 15 जून साहेबांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने सुचलेला हा शब्दप्रपंच. महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण भारताला साहेबांची ओळख. पहाटे पाच वाजेपासून आपली दिनचर्या सुरू करतात. सत्ता असो वा नसो सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विखे पाटील हेच न्यायमंदिर असल्याचे अनेकांनी मनाशी ठरवून घेतलेले आहे.

साधी राहणी परंतु आपण ज्या मातीत घडलो त्या भागाचा आधुनिक कायापालट व्हायला पाहिजे या व्यापक विचाराने नामदार साहेब सतत नवनवीन प्रयोग आपल्या मतदारसंघांमध्ये राबवित असतात आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवतात. एकदा साहेबांना भेटलेला व्यक्ती त्यांचा झाल्याशिवाय राहत नाही हा त्यांचा स्वभाव विशेष.

राज्याच्या मंत्रिमंडळात असताना कृषी, परिवहन, शालेय शिक्षण, विधी व न्याय, गृहनिर्माण तसेच विरोधी पक्ष नेता यासारख्या महत्वपूर्ण खात्यांमध्ये त्यांनी आपल्या निर्णय क्षमतेने घेतलेले ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राने पाहिले आहेतच. जगाला भेडसावणार्या (covid-19) कोरोना या महामारी मध्ये मतदारसंघ भरडला जाऊ नये म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये व परिसरात थर्मामीटर, सॅनिटायझर तसेच गरीब व गरजू नागरिकांना किराणा किट इत्यादीचे वाटप केले.

आपल्या मातोश्री कै. सिंधुताई यांच्या नावाने अन्नछत्र सुरू केले. स्वतःच्या तब्येतीची तमा न बाळगता पुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील व साहेब स्वतः तसेच मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील व सौ. धनश्री ताई विखे पाटील यांच्यावर जबाबदारी टाकली. संपूर्ण परिवाराने जिल्हा अक्षरशः पिंजून काढला.

विद्यमान सरकार मध्ये सर्वसामान्यांसाठी जरी काही निर्णय घेताना सरकारला अडचणी येतात त्यांच्या उपाययोजना देखील साहेब सुचवितात. खरंतर आजचे सरकार कोणाचेही येवो सर्वसामान्यांना कायमच हवे असते ते विखे पाटील सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील विविध समस्या सोडवितांना वडीलधारी नागरिकांची आस्थेवाईक पणे विचारपूस करतात.

आजही शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कृषी संदर्भातील प्रवरा पॅटर्न जाणून घेण्यासाठी राज्यासह परदेशातून लोक येतात किंवा आभासी वर्गाला जोडले गेले आहे. याच गुणधर्मामुळे संपूर्ण कुटुंब जनमानसात आहे. कोणत्याही परिस्थितीचा बडेजाव न करता आपल्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सोहळा सामुदायिक विवाह मध्ये पार पाडून समाजाला याबद्दल साहेबांनी प्रोत्साहित केले आहे.

खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील निरो सर्जन असताना त्यांना समाज परिवर्तनाच्या तपश्चर्येमध्ये समाजासाठी समर्पित केले आहे. जीवनात यश -अपयश, सुख-दुःख, ऊन-सावली सारखे येतच असतात त्याप्रमाणे साहेबांच्या आयुष्यात येऊन गेले आहे पण त्या प्रसंगातून कसे सावरायचे आणि आपला जन्म हा जनकल्याणासाठी ही व्यापक भूमिका गृहीत धरून आयुष्याच्या रंगमंचावर नामदार साहेब अहोरात्र परिश्रम घेतात.

विविध विषयांचा अभ्यास मराठी भाषेत, इंग्रजी हिंदी विषयांवर असणारा प्रभाव, समाज माध्यमांना आकर्षित कर एखादी संकल्पना समजून घेताना विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी तसेच समायोजन हीच त्यांची खासियत…. माझ्या जीवनात साहेबांचा संशोधनाच्या माध्यमातून समाजाची दिशा व व्यक्तीपट जाणून घेण्याचा योग आला..

“कार्यसम्राट नामदार श्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा अभ्यास” या विषयावर शोध प्रबंध ही पदवी मिळवली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे मी सादर केला आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व स्पष्ट अविष्कार हा त्यांच्या ज्ञान यज्ञातून परिचित कार्यप्रणाली मुळे आजही ते जनमानसाच्या मनात सदैव नामदार साहेब या नावाने सर्वत्र ठाण मांडून आहेत

त्यामुळेच अशा या शिक्षण महर्षी सहकार सम्राट उद्योन्मुख विकास पुरुषाला म्हणजेच नामदार साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ………! आपण औक्षवंत व्हा आपणास उत्तम आरोग्य व उदंड उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

डॉ. श्रीकांत विठ्ठलराव बेद्रे,

कोल्हार भगवतीपुर व समस्त बेद्रे उद्योग समुह अहमदनगर जिल्हा (7385878990)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment