अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून विटंबना केल्याप्रकरणी भाजपच्या १३ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले.
प्रतिबंधात्मक आदेश भंगप्रकरणी पोलिसांनी सुधाकर गुंजाळ, डॉ. अशोक इथापे, राजेंद्र सांगळे, राम जाजू, योगराजसिंग परदेशी, कल्पेश पोगूल, सुयोग गुंजाळ, विकास गुळवे, दादापातील नेहे, नानासाहेब खुळे, चंद्रकांत घुले, कापकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.