सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्ष देणार ताकद !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-पक्षीय पातळीवर काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागते. पक्षातील प्रत्येक घटक हा एकमेकांशी जोडला गेला पाहिजे.

संघटन हे महत्त्वाचे असून, पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहाेचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पक्षातील महत्त्वाचा घटक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते.

त्यामुळे आपणावर दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. प्रामाणिक कार्यकर्त्यांची दाखल पक्ष घेत असतोच, त्यामुळे जबाबदारीने काम करून पक्ष वाढवावा.

केंद्र शासनाच्या वतीने सर्वांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्याचा लाभ संबंधितांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षीय पातळीवर संघटनेचे मजबूत करण्याचे काम सुरू असून, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम पक्ष करणार आहे,

असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश बूथप्रमुख राजेंद्र फडके यांनी केले.भाजपची जिल्हास्तरीय बैठक लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, नगर जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, श्याम पिंपळे, कचरू चोथे, सत्यजित कदम, विश्वनाथ कोरडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe