अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाच्या बैठकीचे काम आटोपून नगरकडे येत असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या वाहनाचा अपघात नगर – पुणे रोडवरील शिरुर परिसरात झाला.
या अपघातात बेरड जखमी झाले असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपाची मुंबई येथे आगामी विधानसभा निवडणूका व भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाच्या राज्यासह जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होती.
त्या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीला गेले होते. बैठक पार पडल्यानंतर नगरकडे येत असताना नगर – पुणे रस्त्यावरील शिरुर येथे जिल्हाध्यक्ष बेरड यांच्या वाहनाचा अपघात झाला.
या अपघातात बेरड यांना पाठीला जोराचा मार बसला. उपचारासाठी त्यांना नगर शहरातील उपनगरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांची प्रकृति आता चिंताजनक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.