पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सखी वन स्टॉप सेंटरचे भूमीपूजन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालय आवारातील सखी वन स्टॉप सेंटरचा भूमीपूजन सोहळा पार पडला.

महिलांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल, लवकरच ते स्वताच्या इमारतीत स्थानांतरित होईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि केंद्र पुरस्कृत या सेंटरच्या भूमीपुजन प्रसंगी आमदार संग्राम जगताप,

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुनीलजीत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने-खरात,

अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅ़ड. भूषण बर्‍हाटे आदींची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागाद्वारा प्रकाशित हुंडाबंदी अधिनियमाची माहिती देणार्‍या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

सध्या हे वन स्टॉप सेंटर हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत सुरु आहे. लवकरच ते जा स्वताच्या जागेत स्थलांतरित व्हावे, त्यादृष्टीने वेळेवर काम मार्गी लागावे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

यावेळी स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, शाखा अभियंता श्रीपाद भागवत, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्पाचे श्री. खेडकर, पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. माने, संजय सांगळे, संध्या राशीनकर,

वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापक प्रियंका सोनवणे, प्रसाद शेळके, अमोल वाघमोडे, वैभव देशमुख, सर्जेराव शिरसाठ, वनिता गुंजाळ, प्रशांत गायकवाड, बाळासाहेब साळवे, अनिल गावडे, संजय चाबुकस्वार, प्रकाश वाघ, जुनैत शेख आदींची उपस्थिती होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment