अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. सर्वदूर पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाल्या, तलाव, बंधारे, धरणे देखील तुडुंब भरून वाहू लागली आहे.
यातच कर्जत तालुक्यात देखील चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यातच नुकतीच तालुक्यातील बंधाऱ्याची नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून तसेच कर्जत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या प्रयत्नांतून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदी खोलीकरण,
रुंदीकरण तसेच नवीन बंधारे तयार करण्याचे काम करण्यात आले होते. यामध्ये कर्जत शहराच्या दोन्ही बाजुने नदीचे सुमारे ८ किलोमीटर अंतराचे काम झाले.
सध्या हे सर्व २६ बंधारे दुथडी भरुन वाहत आहेत. त्याचे जलपूजन नगरपंचायतीचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
लेंडी नदीवरील बंधाऱ्यावर नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव, भाजपा शहराध्यक्ष वैभव शहा,
सचिन पोटरे, नगरसेविका, मंगल तोरडमल, वृषाली पाटील, हर्षदा काळदाते, उषा राऊत, आदींच्या उपस्थितीत हे जलपूजन करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved