बिग ब्रेकिंग : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- कोरोना लस तयार करणारी पुण्यातील कंपनी सीरम इन्सिट्यूटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. सीरम इन्सिट्यूटच्या मांजरी परिसरातील एका इमारतीस गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

या घटनेची खबर मिळताच अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रतील 2 गाड्या तसेच कोंढवा व हडपसर केंद्राच्या 2 अशा चार गाड्या घटनास्थली रवाना झाल्या आहेत. 10 गाड्या व एक ब्रांटो व्हेईकल अशा 11 गाड्या गेल्या आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. बीसीजी लस तयार करण्यात येते त्याठिकाणी ही आग लागली आहे. कोरोनाची लस तयार होते तो विभाग वेगळा असल्याचं सांगण्यात येत आहे.

पुण्यातील मांजरी भागातील हा विस्तारीत प्लँट आहे. देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून जवळपास तीन कोटी आरोग्य कर्मचाऱी आणि कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींचा वापर यामध्ये करण्यात येत आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरात लसीकरणास सुरु आहे.

मांजरी येथील याच ठिकाणी लसीचं उत्पादन केलं जात होतं. ज्या इमारतीमध्ये आग लागली आहे तेथून जवळच प्रोडक्शन प्लांट असल्याची माहिती मिळत आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत आहेत. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment