बिग ब्रेकिंग : अहमदनगर ZP मध्ये टेंडर घोटाळा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- जिल्हा परिषदेत पालकमंत्री, लोकप्रतिनिधी,अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मिळून टंेडरमध्ये कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक विकासकामांना खीळ बसली असून, याबाबत आपण येत्या दोन दिवसांत नाशिक विभागीय आयुक्तांकडे निवेदन देणर आहोत.

तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्याकडेही याबाबतचे पुरावे देवून हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके,सोमीनाथ पाचरणे आदी उपस्थित होते.

काल ते एका पऋकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या टेंडर प्रक्रियेत पालकमंत्री, लोकप्रतिनिधी,अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी संगनमताने मोठा घोटाळ केल्याचा आरोप केला. सध्या जिल्हा परिपदेसाठी स्थळ पाहणी अहवाल ही नवीनच टुम आनली असून

यात ज्या ठेकेदारास हा स्थळ पाहणी अहवाल मिळेल त्याच ठेकेदारास संबंधित टंेडर भरता येते.यामुळे मात्र टंेडर भरताना जी स्पर्धा होत होती. ती होत नाही पर्यायाने जिल्हा परिषदेचे उत्पन्न बुडले. २५/१५ हेंडअंतर्गत जवळपास १०० कोटींचा निधी आला  त्यातील ८० कोटी स्टेट तर २० कोटी जिल्हा परिषदेला मिळाला.

यात वेगवेगळ्या कामाचे टेंडर एकत्र भरण्यात आले. यात अधिकाऱ्यांवर थेट मंत्रालयातून दबाव असून यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. राज्यशासनाचा जिल्हा परिषदेवर दबाव असून,केवळ जिल्हा परिषदेसाठीच काम सुरू होण्यापूर्वीच ही नवीन अट ठेवली आहे.

ही अट नसून भ्रष्टाचार करण्यासाठी ठेकेदारांच्यासोयीसाठी केलेली पळवाट असल्याचे देखील वाकचौरे म्हणाले. परत रिटेंडरींग करा विकासकामात पारदर्शकता हवी. काम सुरू होण्यापूर्वीच स्थळपाहणी अहवाल या नावाची टूम पाच महिन्यांपुर्वीच सुरू केली.

त्यात कामे वाटून घेतली. ठरवले त्यालाच कामे दिली. ही सर्व दादागिरीने व बळजबरीने टेंडर पास केली असून लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांवर दबाव आहे.तरी या सर्व कामांचे परत रिटंेडरींग करावे अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करणार आहोत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment