बिग ब्रेकिंग : दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द ! नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द…

Published on -

अहमदनगर :- लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला होता. दरम्यान, या पेपरबाबत शिक्षण खात्याने अखेर मोठा निर्णय घेतला आहे.

‘कोरोना’मुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर रद्द झाला होता.

यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत.

त्यानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीला प्रवेश मिळेल.अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe