मोठी बातमी ! ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा बदल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातल्या 14 हजार ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द असेल.

ग्रामविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यानंतरच संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द केलं आहे.

या कारणामुळे घेण्यात आला हा महत्वपूर्ण निर्णय आतापर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. प

ण सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळेच 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

असा असणार आहे निवडणूक कार्यक्रम

  • 15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील
  • 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी
  • 31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी
  • 4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी
  • 15 जानेवारी मतदान
  • 18 जानेवारी मतमोजणी
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment