मोठी बातमी : राज्यात गारपीटसह पावसाची शक्यता !

Published on -

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोनामुळे अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आपला देश व राज्य सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान एक नवे संकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर उभे राहिलेय.

‘ॲम्फन’ या चक्रीवादळापासून महाराष्ट्राला कोणताही धोका नसला तरी महाराष्ट्रात विस्कळीत स्वरूपात वादळी वारे, विजांच्या तांडवासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता या आठवड्यात कायम आहे.

विशेषत: विदर्भ, मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रात वाटाण्याच्या किंवा बोराच्या आकाराच्या गारादेखील पडू शकतात. महाराष्ट्रात तापमान सुमारे ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

तसेच मोठ्या प्रमाणात बाष्प उपलब्धता आहे. परिणामी भौगोलिक परिस्थितीनुसार वातावरणातील अस्थिरता, हवेचा उर्ध्व झोत (अपड्राफ्ट) यामुळे महाराष्ट्रात ढग बनतील आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात मान्सूनपूर्व पाऊस होईल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe