अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- तीन जणांचे जीव घेणाऱ्या करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला मारण्यात आज सायंकाळी यश आले. गेले पंधरा दिवस तो वनसंरक्षक दलाला हुलकावणी देत होता.
शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी बिबट्या ठार झाल्याने करमाळावासीयांनी जल्लोष केला. बिबट्यावर वांगी नंबर चार, राखुंडे वस्ती (ता. करमाळा) चार येथे शार्प शूटरने गोळ्या घालून बिबट्याला ठार केले.
वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.
3 डिसेंबर रोजी फुंदेवाडी (रायगांव) येथे बिबट्याने ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेले कल्याण फुंदे यांना ठार केले, तर 5 डिसेंबर रोजी अंजनडोह येथील जयश्री शिंदे या लिंबोणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करत बिबट्याने त्यांनाही ठार केले.
तर 7 डिसेंबर रोजी चिखलठार (ता. करमाळा) येथे ऊसतोडणी मजुरागी आठ वर्षीय मुलगी फुलाबाई हरिचंद हिच्यावर हल्ला केला. तिला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात पोचवण्यापूर्वीच तिचे निधन झाले.
या क्रमश: घटनांमुळे करमाळावासीय भयभीत झाले होते. करमाळा तालुक्यात वन विभागाचे २०० कर्मचारी तैनात असताना गेली 15 दिवसांपासून वन विभागाला बिबट्या जेरबंद करता आला नव्हता.
वनविभागाची यंत्रणा ड्रोन, वाघर, डाॅग पथक यांच्या मदतीने त्याचा शोध घेत होती. अखेर आज करमाळा तालुक्यात तीनजणांना ठार केलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभाग व शार्प शूटरना यश आले.
अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला.
मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये