अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाट यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे.
बीडमध्ये 58 पैकी 32 मतं महाविकासआघाडीला तर 21 मतं भाजपला मिळाली. तर यातील 5 जण मतदानास अपात्र ठरले.
त्यामुळे बीड जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीच्या शिवकन्या सिरसाठ या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.
परळीतून पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांनी जोरदार धक्का देत पराभूत केले होते.
त्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. यावेळी भाजपमधून बंडखोरी झाली आहे.
दोन बंडखोर उमेदवारांनी राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने शिवसेना, काँग्रेस आणि भाजप बंडखोरांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे.
या निकालामुळे धनंजय मुंडे यांनी विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही पंकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चारल्याचं दिसत आहे.