अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : अखेर बाळ बोठेस अटक !

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे. 

रेखा जरे यांच्या हत्याकांडातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला आरोपी बाळ कोठे याला हैदराबाद मधून अटक करण्यात आली 

यासंदर्भातील अधिकृत माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे आज सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन येणार आहेत 

रेखा जरे यांची हत्या 30 नोव्हेंबरला नगर पुणे रोडवर सुपा परिसरात अत्यंत निर्घुणपणे करण्यात आली होती या घटनेला तीन महिने उलटून गेले तरी देखील पोलिसांना आरोपी सापडत नव्हता 

मात्र अखेर काल पोलिसांनी आरोपी बाळ बोठेस बेड्या ठोकल्या असून लवकरच त्याबाबत अधिक्रुत माहिती पोलीस देणार आहेत. 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

 

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe