अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदानानंतर आता १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून निकाल स्पष्ट होणार आहे.
मतदान पाट पडले असून त्यानंतर आता विविध एक्झिट पोल करण्यात आले आहेत. यात जनतेचा कल काय आहे हे समोर येतंय. यानुसार निवडणुकीत NDA ला फटका बसण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस-राजद यांचं महागठबंधन झेप घेण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयांचा दावा करत आहेत.
मात्र, सत्ता नेमकी कुणाची येणार आणि मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे हे निकालानंतरच स्पष्ट होईल. जाणून घेऊया ‘एक्झिट पोल’ ची आकडेवारी काय सांगतायत महाएक्झिट पोलनुसार भाजप-जदयू यांच्या ‘एनडीए’ला 110 ते 120 जागा मिळण्याचा अंदाज आहे,
तर राजद आणि काँग्रेस यांचं महागठबंधन 115 ते 125 जागा जिंकण्याचे संकेत आहेत. विधासभेच्या एकूण 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत बहुमतासाठी 122 ही मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे.
मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळणे अवघड असल्याचं मानलं जातं आहे. मागील निवडणुकीत (2014) कोणाला किती जागा मिळाल्या होत्या? जाणून घ्या
- राजद – 80
- काँग्रेस – 27
- जदयू – 71
- भाजप – 53
- लोजप – 2
- रालोसप – 2
- हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1
- एकूण जागा – 243
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved