मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे. सध्याच्या १२२ आमदारांपैकी २५ जणांचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता भाजप सूत्रांनी वर्तविली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि संघाने संपूर्ण राज्यात ‘सर्व्हे’ केला आहे. त्या-त्या ठिकाणचे राजकारण, जनसंपर्काचा अभाव सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ आणि एकूणच कृतीशून्य व्यक्तिमत्त्व अशा पद्धतीच्या निकषांवर साधारण २५ आमदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यात नेमका कोणाचा नंबर लागणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
विधानसभेच्या या निवडणुकीत प्रचंड विजय मिळविण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेना ‘युती’कडून होणार आहे. सुरुवातीच्या काळात हे दोन्ही पक्ष ‘स्वबळा’वर लढतील असे राजकीय तज्ज्ञांना वाटत होते. पण, महायुती करूनच मोठा विजय मिळविण्याचे भाजपने नक्की केले आहे.
अशा परिस्थितीत महायुतीला महाराष्ट्रात २२९ जागा मिळतील असा ‘सर्व्हे’ सांगतो. प्रत्यक्षात यश कितपण मिळेल याचा शेवटी हा अंदाजच आहे. पण, अशा आकडेवारीवरून विरोधकांना खच्ची करण्याचा एकही प्रयत्न भाजप सोडणार नाही, असे सांगण्यात येते.
- नगर जिल्ह्यात आहे असे एक गाव जिथे प्लॅस्टिकच्या कपात चहा मिळणार नाही !
- Big Breaking ! श्रीगोंद्यात शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जमीन विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- 8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?
- 8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ
- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ