अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- देशात कृषी विधेयकावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही शेतकरी संघटनांनी या कृषी विधेयकाला विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
तर सत्ताधाऱ्यांकडून या विधेयकाचे समर्थन करण्यात येत आहे. केंद्राने लागू केलेले हे कृषी विधेयक राज्य सरकारने धुडकावून लावले आहे.
यामुळे अकोलेमध्ये भाजप कायकर्ते आक्रमक झाले आहे. येथे भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला मंजूर करुन शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणारे पाऊल उचलले आहे.
माञ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. हा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी
भारतीय जनता पार्टी राज्यात आज या स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये तालुका व शहरातील सर्व भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved