भाजप सह अजित पवारांना धक्का !

Ahmednagarlive24
Published:

मुंबई :- महाराष्ट्र झोपला असताना काल एका रात्रीत नाट्यमय घडामोडी होऊन भल्या सकाळी ८ वाजता राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या सहकार्याने भाजपचे सरकार स्थापन झाले.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात नवा ट्वीट्स आणला

दरम्यान अजित पवार यांच्या सोबत असलेल्या १३ पैकी सात आमदार माघारी परतले असून सहा आमदार पक्षाच्या संपर्कात नाहीत. ते अजित पवार यांच्यासोबत राहीले आहेत.

मात्र, यातील काही आमदारांनी अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी आणि शरद पवारांसोबत राहण्याचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळी भाजपसह अजित पवार यांना हा जोरदार धक्का आहे.

जो राष्ट्रवादीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो भाजपाच्या कोणत्या सभेत जाणार नाही. आपल्या देशामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व संकटात येईल.

जनमत ते भाजपाच्या विरोधात असल्याने त्यांना मतदारसंघातील सामान्य माणूस त्यांना पाठींबा देणार नाही अशी कडक शब्दातील तंबी शरद पवार यांनी दिली.

सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा निवडणुक झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढून त्यांचा पराभव करेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment