अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांनी ना. बाळासाहेब थोरात साहेबांवरती टीका करणं हे त्यांचं मानसिक संतुलन ढासाळल्याच दाखवतं.
अरुण मुंडे यांनी ना. थोरात यांच्यावर केलेल्या टीकेला नगर शहर कॉंग्रेसचे नेते किरण काळे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.
ना. थोरात यांनी भाजप बाबत केलेल वक्तव्य माग घेऊन माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी केली होती.
त्यावर बोलताना काळे म्हणाले की, ना. थोरात साहेब जे बोलले आहेत ते सत्यच बोलले आहेत.
त्यांच्या वक्तव्याच्या एवढ्या काय मिरच्या यांना झोंबल्या आहेत ? भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे पुरावे आम्ही ना. थोरातांना देऊ.
याचा खरपूस समाचार घेताना काळे म्हणाले की, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरावा द्यावा लागत नाही, त्यांच काम समाजाला दिसतं.
त्यामुळे आपण आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडू नये असा खोचक सल्ला काळे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष यांना दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com