भाजपने बबनराव पाचपुते यांच्याकडे दिली ही जबाबदारी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आपल्या बाजूने आणण्याची जबाबदारी भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्याकडे सोपवली आहे.

आम्ही विधीमंडळात बहुमत सादर करू. यात मला अजिबात साशंकता वाटत नाही. ‘ऑपरेशन लोटस’बाबत गुप्तता राहू द्या, असे सूचक वक्तव्य बबनराव पाचपुते यांनी केले आहे.

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी माझा चांगला संबंध आहे आणि त्यासोबत सर्व आमदारांसोबत माझा चांगला संपर्कही आहे, असेही बबनराव पाचपुते यांनी म्हटले आहे.

बबनराव पाचपुतेंनी केलेल्या या दाव्यामुळं खरंच राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत का? हा मोठा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते आणि नारायण राणे या चार नेत्यांवर’ ऑपरेशन लोटस’ची जबाबदारी दिली गेल्याची माहिती समजत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणे हे काँग्रेसमधून तर गणेश नाईक आणि बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment