अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्रातील भाजपा सरकार पोलिसांमार्फत अत्याचार करीत आहे.
या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात सोमवारी सायंकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन, खा. बाळू धानोरकर, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचेअध्यक्ष आमदार विकास ठाकरे, सुनील केदार, अमिन पटेल,
अस्लम शेख, अमित झनक, माजी मंत्री राजेंद्र मुळक, अनिस अहमद, आ. प्रणीती शिंदे, सुलभा खोडके, प्रतिभा धानोरकर, हिरामण खोसकर, राजू आवळे, संजय जगताप, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी उपस्थित होते.