अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलन करत होते. त्याकडे मात्र भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आलं.
महाविकासआघाडी सरकारनं मागील चार महिन्यांपासून दूध दराच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे. असं सांगत भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही, असं वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय.
दरम्यान, भाजपच्या अधिकारांबद्दल मंत्री थोरात यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाची काय भूमिका असणार, याकडे अनेकांचं लक्ष असेल.
सोमवारी भाजपच्या या दूध आंदोलनाला सुरुवात झाली. अकोला, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. दुधाला प्रति लीटर ३० रुपये भाव द्या,
केंद्रानं घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तात्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा, यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर १० रुपये अनुदान वर्ग करा, या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी संतप्त आंदोलक शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाणहृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले,
डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा