सांगली :- भाजपचे ओळखपत्र असलेले कार्यकर्ते व नेत्यांना राज्यात टोल आकारला जात नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे.
या वेळी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे आणि प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे उपस्थित होते. भाजपच्या ओळखपत्रावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस यांची छायाचित्रे
असल्याने टोल नाक्यावरील कर्मचारी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून टोल आकारणी करत नाहीत, असा दावा करताना हे कायदेशीर नाही, याची आपल्याला माहिती आहे.
मात्र, टोल कर्मचारी महसूलमंत्र्यांचा फोटो पाहून अशा वाहनांना माफी देतात, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. सध्या भाजपची सदस्यनोंदणी सुरू असल्याने या दाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपला टोल नाक्याचे कर्मचारी घाबरतात
भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांना जी पावती दिली जाते त्या पावतीवरही टोल नाका माफ केला जातो, अशी आपल्याला माहिती मिळाली आहे. प्रत्यक्षात हे कायदेशीर नाही.
मात्र, सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात असल्याने टोलवरील कर्मचारी घाबरतात आणि वादावादी नको म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना टोलमाफी मिळते, असे वक्तव्यही त्यांनी केले.
- बिजनेसमधुन नोकरीपेक्षा जास्त कमाई होणार ! ‘हा’ बिजनेस सुरु करा आणि कमवा वर्षाकाठी 7 लाख रुपयांचा निव्वळ नफा, वाचा सविस्तर….
- 2 हजाराची नोट बंद केल्यानंतर RBI ने उचलले आणखी एक मोठे पाऊल, 500 च्या नोटांबाबत जारी केले सर्क्युलर
- गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ 3 बँका एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देतात सर्वाधिक व्याज
- Maha Cabinet Meeting : अहिल्यानगरात दुष्काळाची आग, सरकारच्या मेजवानीला रंग : जनतेच्या तोंडाला पाणी नाही, मंत्र्यांच्या थाळीत मिष्टान्न!
- Ahilyanagar Politics : विखे – राजळे – कर्डीले – पाचपुतेंत रस्सीखेच ? भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावरून अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय ‘गेम’