श्रीगोंद्यात सामाजिक कार्यकर्त्याचा गळ्याला फास अडकवलेला मृतदेह आढळला

Published on -

श्रीगोंदे :- तालुक्यातील पिसोरेखांड येथील भरत नारायण कराळे (२६) या तरुणाचा गळ्याला फास अडकवलेल्या स्थितीतील मृतदेह देऊळगावच्या हद्दीत शुक्रवारी आढळला.

दरम्यान मृत्यूपूर्वी त्याने गावातील एक ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार श्रीगोंदे पोलिसांत दिली होती.

या तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पिसोरेखांड येथील भरत नारायण कराळे हा तरुण खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता.

सामाजिक कामातही तो सहभागी होत असे. काही दिवसांपूर्वी ग्रामसेवक आणि या तरुणात शाब्दिक वाद झाले होते.

गावात पाणी टंचाई असल्याने आमच्या भागात पाण्याचा टँकर द्यावा, अशी मागणी केल्याने ग्रामपंचायत सदस्याने भरतला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.

याबाबत ६ जूनला संध्याकाळी या तरुणाने फिर्याद दिली होती. त्यानंतर गायब झालेल्या भरतचा मृतदेह शुक्रवारी सकाळी देऊळगाव हद्दीत गळ्याला फास लावलेल्या स्थितीत स्थानिक नागरिकांनी पाहिला.

पोलिसांनी मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृताच्या नातेवाईकांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe