अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गालगत गुंजाळवाडी गावाच्या शिवारात एका शेतात बेवारस स्थितीत एका इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आला.
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पुणे महामार्गालगत गुंजाळवाडी गावाच्या शिवारात कमलाबाई कराळे यांच्या मालकीच्या शेतात अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळला. अंदाजे ४० वर्ष वयाचा मृतदेह आहे.

file photo
याबाबत घारगाव पोलीस स्टेशनाला गुंजाळवाडी येथील पोलीस पाटील शिवप्रसाद दिवेकर यांनी माहिती दिली. यांनतर सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पंचनाम्यानंतर संगमनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. मयताच्या अंगात पिवळा चौकटी शर्ट, आत स्वेटर, मृताची ओळख परिसरातील नागरिकांना मदत करण्याकामी पोलिसांमार्फत आवाहन करण्यात आले आहे.