ब्रेकिंग ! भारताच्या ‘ह्या’ स्वदेशी लशीला मिळाली मंजुरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- फायझर आणि सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकने स्वदेशी पद्धतीने विकसित ‘कोवॅक्सिन’ या लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयची (DCGI) परवानगी मागितली होती.

आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे.

DCGI निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच BBV152 ही लस. ही लस यूकेत (UK) आढळलेल्या नव्या कोरोनाव्हायरसविरोधातही प्रभावी आहे, अशी माहिती याआधीच कंपनीनं दिली आहे. त्यामुळे या लशीला मंजुरी म्हणजे नव्या कोरोनाव्हायरसलाही टक्कर देण्याच्या दिशेनं सरकारनं उचललं सर्वात मोठं पाऊल आहे.

ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आला होता. कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.

आर्थिक घडी पुरती विस्कटलेली आहे. देशभराचा विचार करता महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त आहे. सर्वांचेच लक्ष लशीकडे लागलेले असता आता आलेली ही बातमी सर्वांसाठी सुखावह आणि आशादायक ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment