अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी खासदार शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे वक्तव्य केले होते. याचे पडसाद आता उमटण्यास सुरवात झालीय.
पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळून निषेध केलाय. पडळकरांनी शरद पवारांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी युवकने केलीय.
दरम्यान, माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांच्या या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पडळकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
”राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही.
याबाबत मी गोपिचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भारात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केले आहे. याबाबत ते लवकरच स्पष्टीकरण देतील.”
विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील शरद पवारांवरील वादग्रस्त विधानावर गोपीचंद पडळकरांची शाळा घेतली आहे. गोपीनाथ पडकरांनी केलेलं वक्तव्य भाजपाचं अधिकृत विधान नाही असे सांगितले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews