ब्रेकिंग! ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचं दुःखद निधन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सोबत काम केलेले व नगरकरांचे चांगले परिचित असे ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे आज दुःखद निधन झाले आहे.

वयाच्या ४९ व्याज वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रशांत यांनी आपल्या आयुष्यात आजवर पिस्तुल्या, फँड्री, गुगलगाव, गणवेश या नावजेलल्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

तसेच अनेक नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षक विसरू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून कांबळे आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनामुळे नगरच्या सांस्कृतिक व नाट्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कांबळे यांना लाहणपणापासून नाट्य-सांस्कृतिक क्षेत्राची आवड़ होती.

राज्य नाट्य स्पर्धा, भाईंदर रंगभूमी, महापौर करंडक, नगर, नाट्य परिषद, थियटर अकेडमी यासह राज्यातील अनेक स्पर्धेत त्यांनी परितोषिके पटकावली आहे.

एक आढावा त्यांच्या नाट्य करिअरचा :- मन धुव्वधार, थँक्यू मिस्टर ग्लडॅ, नीरो, हमीदाबाइची कोठी,कोलाज, तर्पण, मृत्युछाया, याचक, तीर्थरूप चिरंजीव,अग्निवेश अशा अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. अशा या महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment