Mini Tractor Subsidy: मिनी ट्रॅक्टर घ्या आणि शासनाचे 3 लाख 15 हजार रुपये अनुदान मिळवा! जाणून घ्या ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
mini tractor subsidy

Mini Tractor Subsidy:- शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना समाजातील विविध घटकांकरता राबवण्यात येतात. अशा योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. शासनाच्या या योजनांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी तसेच कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे असलेल्या योजनांचा आपल्याला समावेश करता येईल.

या योजनांमध्ये पाहिले तर राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देखील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये जर आपण पाहिले तर या विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती

व नवबौद्ध घटकातील जे काही स्वयंसहायता बचत गट आहेत त्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा योजनेच्या माध्यमातून अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचा लाभ देण्यात येणार आहे.

जर 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये  मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज सादर करण्याचे

आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्हा सोबतच ही योजना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या राबवली जात आहे.

 मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावीत

1- यामध्ये बचत गटांची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती व कृषी विभागाकडे नोंदणी झाल्या बाबतचे बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते.

2- तसेच बचत गटातील जे काही सदस्य आहेत त्यांचे सगळ्यांचे जातीचे दाखले असणे गरजेचे आहे.

3- गटातील सदस्यांचे तहसीलदार यांच्याकडील रहिवासी प्रमाणपत्र व आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

4- तसेच बचत गटातील सदस्यांचे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.

5- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा स्वयंसहायता बचत गट हा पुरुष किंवा महिलांचा असणे गरजेचे आहे.

6- तसेच या बचत गटातील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावे.

7- तसेच या स्वयंसहायता बचत गटांचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे खाते असणे गरजेचे आहे व हे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या नावे संयुक्त असावे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या आधार क्रमांकाशी लिंक असावे.

8- तसेच बचत गटाचे ताळेबंद प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. यामध्ये जर अर्जदारांची संख्या जास्त झाली तर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

9- यामध्ये मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने यांची कमाल किंमत तीन लाख 50 हजार रुपये राहील व यामध्ये 90% म्हणजेच तीन लाख 15 हजार रुपये शासकीय अनुदान देण्यात येईल व बचत गटांचा हिस्सा 10% म्हणजेच 35 हजार रुपये इतका असेल.

 महत्वाची सूचना

 यामध्ये मुदतीनंतर येणारे जे काही अर्ज आहेत त्यांचा विचार यावर्षीच्या लाभासाठी केला जाणार नाही. तसेच सन 2022-23  मध्ये जे काही अर्ज सादर करण्यात आलेले होते व पात्र ठरलेल्या बचत गटांनी नव्याने केवळ अर्ज सादर करावा. जर बचत गटांनी सादर केलेले अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींची तात्काळ पूर्तता करावी.

 कोल्हापूर जिल्ह्यातील बचत गटांनी या ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करावा

 अधिक माहिती करिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय विचारेमाळ, कोल्हापूर

 दूरध्वनी क्रमांक 0231-2651318 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe