लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी मोफत बस प्रवासाचा निर्णय रद्द ;असे असतील दर

Ahmednagarlive24
Published:

पुणे : राज्यात ठिकठिकाणी अडकलेले मजुर, कामगार, विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी शासन मोफत एसटी बस उपलब्ध करून देण्याच्या विचाराधीन होते. परंतु शासनाने हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीने प्रति बस प्रति किलोमीटर ४४ रुपये तिकीट दर निश्चित केला आहे. सुरक्षित अंतरासाठी एका बसमध्ये जास्तीत जास्त २२ प्रवासी असतील. त्यानुसार या प्रवाशांकडून किलोमीटरप्रमाणे विभागून पैसे आकारले जातील.

एसटीकडे पैसे जमा झाल्यानंतर बस सोडण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडूनच प्रवाशांची नोंदणीनुसार बसची मागणी केली जात आहे

शनिवारी सर्वांना एसटीतून मोफत प्रवास करू दिला जाणार असल्याचा आदेश राज्य शासनाचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काढला होता. पण त्यानंतर काही तासातच दुसरा आदेश काढण्यात आला.

या देशाप्रमाणे इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरीक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अकडलेले असतील त्यांना महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजुर व इतर व्यक्ती जे इतर राज्यांतून महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत आले आहेत,

त्यांना त्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचविण्यासाठी एसटीची सेवा मोफत असेल. याशिवाय कोणत्याही इतर प्रवासासाठी बससेवा मोफत उपलब्ध असणार नाही,

असे सुधारीत आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार एसटी महामंडळाकडून तिकीटाची आकारणी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment