12th Result 2023 News : बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या अनेक दिवसांपासून बारावीच्या निकालाची वाट पाहिली जात आहे.
अशातच सीबीएससी बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे CBSE बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामुळे CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांची गेल्या काही दिवसांची आतुरता आता संपुष्टात आली आहे. दरम्यान यंदा बारावीमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.
यंदा 90.68 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 84.67 टक्के एवढी राहिली आहे. एकूण 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज आपण सीबीएससी बारावीचे निकाल कशा पद्धतीने विद्यार्थी चेक करू शकतात याबाबत जाणून घेणार आहोत.
CBSE 12वी निकाल कसे पाहणार?
CBSE बारावीचे निकाल पाहण्यासाठी CBSEच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in या वेबसाईटवर जाऊ शकता.
या दोन्ही CBSE च्या अधिकृत वेबसाईट आहेत. आपण या वेबसाईटवर गेल्यानंतर या वेबसाईटच्या होम पेजवर, CBSE बारावी निकालाची लिंक दिसेल. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
यानंतर लॉगिन पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपली माहिती टाकून निकाल पाहता येणार आहे. येथे विद्यार्थी आपला परीक्षेचा रोल नंबर म्हणजे आसन क्रमांक आणि जन्मतारीख टाकून आपला निकाल पाहू शकणार आहेत.
तसेच निकालाची प्रिंट देखील विद्यार्थ्यांना येथून काढता येणार आहे. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल देखील आगामी काही दिवसांत लागणार आहे.
एका मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल हा 3 किंवा 4 जून रोजी लागणार आहे. तसेच 10 वी चा निकाल हा 10 जूनच्या आसपास लागणार आहे.