अहमदनगर :- महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांनंतर राष्ट्रपती राजवट संपली आणि नवं सरकार स्थापन झालं. सत्तासंघर्षात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारत आपलं सरकार स्थापन केलंय .
आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे जन्मगाव असलेल्या देवळाली प्रवरा येथे आनंद व्यक्त करण्यात आला.
येथील भाजप कार्यकर्ते प्रकाश पारख यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा केला.
अजित पवार यांचे देवळाली प्रवरा हे आजोळ असून स्व. सर्जेराव कदम व स्व. आण्णासाहेब कदम हे त्यांचे मामा होते. आजोळी पवार यांचा जन्म झाला होता.
आज सकाळीच अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष व्यक्त केला.