अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष वर्षा नगरे यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केला.
इतर सदस्यांना संधी देण्यासाठी राजीनामा दिल्याचे सांगून यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपंचायतीच्या सभागृहात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
पंधरा दिवसांपूर्वी निवडण्यात आलेल्या विविध विषय समित्या अयोग्य झाल्याने त्या पुन्हा गठीत करण्यासाठी बैठक घेतली होती.
बैठकीपूर्वी चेडे यांच्या दालनात नगरसेवक दत्तात्रय कुलट, किसन गंधाडे आदींची चर्चा होऊन राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला.
दत्तात्रय कुलट यांना उपनगराध्यक्षपदी संधी मिळेल, अशी चर्चा आहे. पुढील वर्षी नगपंचायतची निवडणूक होणार असल्याने सर्व सदस्यांना कुलट यांचे नाव मान्य होऊ शकले.